JIIU’S Indian Institute of Medical Science & Research, (Medical College & Noor Hospital) Warudi वतीने आज दिनांक 15 ऑक्टोबर 2026 रोजी ‘जागर आरोग्याचा – मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ या मोहिमेअंतर्गत आरोग्य जनजागृती उपक्रम अबू हुरैरा मदरसा, छ. संभाजीनगर – जालना रोड येथे घेण्यात आला.
या वेळी ‘व्यायाम व शारीरिक तंदुरुस्ती – व्यायामाचे फायदे आणि व्यायामाचे प्रकार’ या विषयावर व्यायाम तज्ज्ञ अशर शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्यायामाचे महत्त्व, नियमित व्यायामाचे शरीरावर होणारे फायदे व विविध व्यायाम प्रकार याबाबत प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली.
या उपक्रमाला विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Recent Comments